लालगबाग सिलिंडर स्फोटातील आणखी तिघांचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहचला 5 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लालबाग येथील चार मजली साराभाई इमारतीमधील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या आणखी तिघांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 11) मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ.अली यांनी दिली. आता या दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर ममता मुंगा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.

मंगेश राणे (61) , महेश मुंगे (56) आणि ज्ञानदेव सावंत (85) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर केईएममधून 3 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मसिना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.गणेश गल्लीमधील तळमजला अधिक चार मजली साराभाई इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 17 मध्ये रविवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोटात तब्बल 16 जण जखमी झाल्याची घटना घडली होती. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, खोली क्रमांक 16, 17, भितीसह या घरांचे मोठे नुकसान होते.