Coronavirus : भारतात ‘कोरोना’चे आणखी 3 प्रकरणं, देशातील रूग्णांची संख्या 34 वर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसची महामारी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या व्हायरसने आता भारतात कहर माजवण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी भारतात कोरोना व्हायरसचे तीन आणखी नवी प्रकरणं समोर आली आहेत. यात दोन लडाख आणि एक तमिळनाडूचे कोरोनाग्रस्त आहे. यामुळे भारतात कोरोना व्हायरसच्या बाधित रुग्णांची संख्या वाढून 34 झालेली आहे.

जो नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे, तो ओमानहून तमिळनाडूमध्ये आलेला होता. डॉक्टर म्हणाले, जेव्हा त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो पॉजिटिव्ह असल्याचे कळाले. याशिवाय इराणहून लडाखला आलेले दोन व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले. देशात या प्रकारे कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. याचे आतापर्यंत 34 प्रकरणं समोर आलेली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली बैठक –
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मंत्रालयांकडून कोरोना व्हायरसच्या परिस्थितीसंबंधित माहिती जाणून घेतली. या बैठकीत आरोग्यमंत्री हर्षवर्धन, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अन्य मंत्रालयांचे मंत्री सहभागी झाले होते. बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, देशभरात 52 प्रयोगशाळामध्ये नमून्यांचे परीक्षण केले जात आहे.

इराणहून नमूने घेऊन दिल्ली पोहोचले विमान –
इराणमधील कोरोना व्हायरसचे संशयित भारतीय रुग्णांच्या लाळेचे नमूने घेऊन महान एअरचे विमान शनिवारी सकाळी तेहरानहून नवी दिल्लीत पोहोचले होते. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अनेक इराणी नागरिकांना घेऊन शनिवारी सकाळी 10.30 वाजता विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या विमानाने उड्डाण केले होते.

अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले होते की इरानच्या तेहरानहून एक विमान कोरोना व्हायरसच्या संशयित 300 भारतीय रुग्णांच्या लाळेचे नमूने घेऊन येणार आहे. परंतु हे कळू शकले नाही की नेमके किती भारतीयांच्या लाळेचे नमूने आणण्यात आले आणि किती इराणी नागरिकांना सोबत घेऊन गेले.