‘स्वाइन फ्लू’ने पूर्व हवेलीत तिघांचा मृत्यू

उरुळी कांचन : पोलीसनामा आॅनलाईन

हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचा १३ दिवसापूर्वी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचे मंगळवार (ता.२५) रोजी निधन झाले. तेरा दिवसाच्या आत स्वाइन फ्लूमुळे पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे उरुळी कांचन परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’256b3ca1-c0d2-11e8-87f9-c348c12bb631′]

तर दुसरीकडे लोणी काळभोर (ता. हवेली )येथील एका ‘बडया’ खाजगी रुग्णालयात तब्बल १० रुग्ण दाखल झाले असून एकाचा सोमवारी (ता.२४) रोजी संध्याकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली.

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण 

हवेलीच्या पूर्व भागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व हवेलीत उरुळी कांचन सह लोणी काळभोर परिसरात मागील काहि दिवसापासून डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. उरुळी कांचन हद्दीत ५०० पेक्षा अधिक डेंग्यू सदृश साथीच्या रोगाची लागण झाली असून, उरुळी कांचन परिसरात सर्व रुग्णालये भरून गेली आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सर्वेक्षणाची कागदी घोडे नाचवून प्रशासनाची दिशाभूल करत आहे.

[amazon_link asins=’B07B4KWVK1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c931fb3-c0d2-11e8-95dc-cfe52eebafbe’]

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू
स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 31 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून शुक्रवारी (दि. १४) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने त्यांना त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.