मुंबईतून शिर्डीला जाणार्‍या 3 साई भक्तांचा अपघातात मृत्यू, एकजण गंभीर

सिडको : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईहून दुचाकीवरून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना ट्रकच्या धडकेत तीन साईभक्तांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर रविवारी ( दि. 3) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा हा अपघात झाला. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला आहे. अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

वैजनाथ चव्हाण (21), सिध्दार्थ भालेराव (22), आशिष पाटोळे (19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अनिष वाकळे (17) गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विलेपार्ले येथून शनिवारी सायंकाळी 6 वाजता 10 ते 15 साई भक्त दुचाकी वरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. विल्होळी नाक्याकडून नाशिककडे जाताना सिडकोतील लेखा नगर उड्डानपुल येथे रविवारी मध्यरात्री अज्ञात ट्रकने दुचाकी होडा युनिकॉन एमएच -02- एफडी 4248 आणि एमएच -02- एफएच 626 या दुचाकीला धडक दिली. यात वैजनाथ चव्हाण, सिध्दार्थ भालेराव, ,आशिष पाटोळे, यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे हा गंभीर जखमी झाला आहे.