बढती मिळाल्याने 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची दिन दिन दिवाळी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन-राज्य पोलिस दलातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍तपदी बढती देण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने गेल्या काही दिवसात सहाय्यक आयुक्‍त, पोलिस उपायुक्‍त तसेच पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्‍तपदी बढती मिळालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात सहाय्यक पोलिस आयुक्‍त म्हणुन कोठे नियुक्‍ती करण्यात आली आहे हे पुढील प्रमाणे दिले आहे.

नितीन भोसले-पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे ते सहाय्यक पोलिस आयुक्‍त, अमरावती शहर), विद्यानंद मुरलीधर काळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जालना ते उपविभागीय पोलिस अधिकारी, दर्यापूर उपविभाग, अमरावती ग्रामीण) आणि श्रीपाद बाळकृष्ण काळे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बृहन्मुंबई ते पोलिस उप अधिक्षक-मुख्यालय, अकोला). सहाय्यक आयुक्‍तपदी बढती मिळालेल्यांपैकी नितीन भोसले-पाटील हे सध्या पुण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण, पुणे शहर, मुंबई तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकात कर्तव्य बजाविले आहेत. कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी देखील ते काही वर्ष होते. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस निरीक्षक गेल्या अनेक महिन्यांपासुन बढतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आज (बुधवारी) सहाय्यक आयुक्‍तपदी बढती देण्यात आली आहे. ऐन दिवाळीला सुरवात होण्यापुर्वी सहाय्यक आयुक्‍तपदी बढती मिळाल्यामुळे 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची दिन दिन दिवाळी साजरी झाली असुन त्यांना गृह विभागाने दिवाळीच्या निमित्‍ताने एक आगळे वेगळे गिफ्टच दिले आहे.

जाहिरात

Loading...
You might also like