×
Homeक्राईम स्टोरी३ हजाराची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

३ हजाराची लाच घेताना सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

उस्मानाबादः पोलीसनामा आॅनलाईन

सावकारकीचा व्यावसाय करण्यासाठी लागणारा परवाना काढत असताना फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सहाय्यक निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सय्यद अनिस तय्यबअली असे अटक करण्यात आलेल्या सहाय्यक निबंधकाचे नाव आहे. सहाय्यक निबंधकालाच लाच घेताना अटक केल्यामुळे महसूल खात्यात  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. ही कारावीई बुधवारी (दि.३०) करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराला सावकारकीचा व्यावसाय करायचा होता, त्यासाठी आवश्यक असणारा परवाना काढत असताना, फाईल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सापळा लावला असता १५०० रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना आरोपीला अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर जिर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बी. व्ही गावडे, व्ही. आर. बहिर यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक व्ही. आर. बहिर हे करीत आहेत.

Must Read
Related News