गणपतीपुळे येथे कोल्हापूरच्या 3 पर्यटकांचा बुडून मृत्यु

गणपती पुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील तिघांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यांच्यापैकी दोघा महिलांचे मृतदेह सापडले असून एक पुरुष बेपत्ता आहे.

काजल जयसिंग मचले (वय १८), सुमन विशाल मचले (वय २३) आणि राहुल अशोक बागडे (वय २७) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

हे तिघेही पर्यटक कोल्हापूर येथील कसबा बावडामधील राहणारे आहेत. आज पहाटे ते इतरांबरोबर समुद्रावर आले होते. समुद्र काहीसा खवळलेला आहे. अशात ते पाण्यात आतपर्यंत गेल्याने लाटेबरोबर ते आत ओढले गेले. किनाऱ्यांवरील जीव रक्षकांनी शोध घेतल्यानंतर दोघांचे मृतदेह मिळाले असून राहुल बागडे याचा शोध घेतला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like