वुहानच्या लॅबमध्ये मिळालेल्या वटवाघुळांमध्ये आढळणारे 3 प्रकारचे ‘व्हायरस’, कोणताही ‘कोरोना’ सारखा नाही : अभ्यास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहानमधील वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये वटवाघुळांमध्ये तीन प्रकारचे व्हायरस सापडले आहेत. मात्र, यापैकी कोणताही व्हायरस कोरोना व्हायरसशी जुळत नाही. संस्थेचे संचालक वोंग यांयी यांनी ही माहिती दिली. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनाची सुरुवात वुहानमध्ये झाली आहे. यामुळे ३.४० लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. हा विषाणू वटवाघुळांमधून आला आणि सस्तन प्राण्यांच्या माध्यमातून मानवामध्ये पसरला. तर एकीकडे वुहान इन्स्टिट्यूटचे संचालक वोंग यांयी यांनी चिनी मीडियाला सांगितले की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इतरांचे दावे पूर्णपणे बनावट आहेत.

वोंग यांची मुलाखत १३ मे रोजी रेकॉर्ड केली होती आणि शनिवारी त्याचे प्रसारण केले गेले. वोंग म्हणाले की, सेंटरमध्ये काही कोरोना व्हायरसची ओळख केली गेली आहे. आमच्याकडे जिवंत विषाणूंचे तीन प्रकार आहेत. पण सार्स कोव्ह-२ शी हे केवळ ७९.८% जुळतात. प्रोफेसर शी यांच्या मागच्या संशोधनात, त्यांनी SARS विषाणूंसारखे नसलेल्या व्हायरसकडे लक्ष दिले नाही. ते म्हणाले की, ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ कट रचून दोन महिन्यांपासून आरोप लावत आहे कि व्हायरस वुहान लॅबमधून आला आहे.

ते म्हणाले की, आम्हाला ३० डिसेंबरपूर्वी अजिबात माहित नव्हते कि असा व्हायरस अस्तित्त्वात आहे. ३० डिसेंबर रोजी व्हायरसचे काही नमुने त्यांच्याकडे आले असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीनंतर त्याचे जीनोम २ जानेवारी रोजी काढले गेले होते आणि ११ जानेवारी रोजी डब्ल्यूएचओला याबाबत माहिती दिली गेली होती. राष्ट्रपती ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीनवर दावा केला आहे की, कोरोना व्हायरसचा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीशी संबंध आहे. ट्रम्प असेही म्हटले की, त्यांच्याकडे याचे पुरावे आहेत. याच प्रयोगशाळेत कोरोना तयार केला गेला आहे. मात्र, याबद्दल सांगण्याची परवानगी नसल्याचे ते म्हणाले.

चीन कोरोना वरील तपासासाठी सज्ज, पण राजकीय हस्तक्षेप सहन करणार नाही
चीनच्या वार्षिक संसद अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत वांग म्हणाले की, “चीन तपासणीसाठी तयार आहे, पण हा तपास व्यावसायिक, निष्पक्ष आणि रचनात्मक असावा.” निष्पक्षता म्हणजे ही प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त आहे, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचे पालन केले जावे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह जगातील सुमारे १०० देशांनी जागतिक महामारीच्या उत्पत्तीबद्दल स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली होती.