‘आई-वडिलांच्या संमतीनं 3 काकांनी माझ्याशी वर्षानुवर्ष केला बलात्कार, आता लहान बहिणीसोबत देखील…’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हरियाणाच्या हिसार मध्ये एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. जेव्हा २१ वर्षांची मुलगी पोलिस ठाण्यात पोहोचली तेव्हा तिने आपल्याच घरात तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबत सांगितले तर हे ऐकून पोलिसही चकित झाले. काही प्रमाणात धाडस करुन मुलीने पोलिसांना सांगितले की आई-वडिलांच्या संमतीने तिन्ही काकांनी तिच्यावर अनेक वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काकांनी घरात असलेल्या तिच्या अल्पवयीन बहिणीवर देखील बलात्कार करण्यास सुरुवात केली तेव्हा पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

पीडिताची वेदनादायक कहाणी
पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की ती तारुण्यात असल्याने घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. तिच्या तिन्ही काकांनी आधी तिच्या आईशी नातं बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. तिने याबाबत तिच्या पालकांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या पण तिला वाचवण्याऐवजी ते तिला मारहाण करीत असत.

पीडित मुलीचे २०१७ मध्ये लग्न करून दिले
पीडित मुलीने सांगितले की २०१७ मध्ये तिचे लग्न झाल्यावर आणि तिच्या नवऱ्याबरोबर राहायला गेल्यावर तिच्यावर होणार छळ थांबला. यानंतर घरात तिच्या लहान बहिणीवर तिच्या काकाने बलात्कार केला. छोट्या बहिणीला त्यांनी हॉटेलमध्ये नेले जेथे इतरांनीही तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने सांगितले की तिची लहान बहीण खूप घाबरली होती, म्हणून तिने पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास नकार दिला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला
पीडितेची तक्रार येताच हिसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींविरोधात पोक्सो कायद्यासह अंतरिम कलम ३५४, ३७६, ३७६२एफ, ३२३, ५०६, १२०बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यात पीडितेचे पालक आणि तिचे तीन काका यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षक कमला देवी यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/