‘त्या’ लाचखोर तलाठ्यास ३ वर्षांचा कारावास

नांदेड :  पोलीसनामा ऑनलाइन – शेताचा फेरफार करण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी विष्णू प्रल्हादराव राजूरवार यांना येथील जिल्हा विशेष न्यायालय क्रमांक एकचे न्यायाधीशएस. एस. खरात यांनी पाच हजारांच्या दंडासह तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या तलाठ्याने शेतीचा फेरफरा करुन देण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाले.

किनवट तालुक्यातील ढिगडी मंगाबोडी शिवारातील शेत सर्व्हे नं. ६२ मधील तीन एकर शेताचा फेरफार करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी विष्णू प्रल्हाद राजूरवार याच्याविरुद्ध ९ ऑगस्ट २०१२ रोजी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपाधीक्षक प्रताप डी. शिकारे यांनी तपास करून राजुरवारविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावरुन न्या. एस. एस. खरात यांनी तलाठी विष्णू राजुरवार याला तीन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड व कलम १३ च्या गुन्हयासाठी तीन वर्षे कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरची शिक्षा ही एकत्रितरित्या भोगावयाची आहे. दंड न भरल्यास एक महिना साधी शिक्षा भोगावी लागणार आहे.

या प्रकरणी शासनातर्फे सरकारी वकील एस. टी. लाटकर यांनी युक्तिवाद केला. पोलिस अधीक्षक संजय लाटकर व पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड येथील कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक कपिल शेळके, पोहेकॉ सुधीर खोडवे, पो. ना. मिलींद बोडके व पोना जयराम विलदगावे यांनी कामकाज पाहिले.

पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे द्वीशतक, १ कोटीची लाच घेताना बडा मासा (तहसीलदार) गळाला