96 लाख लुटीच्या प्रकरणात एपीआयसह पोलिसाला 3 वर्षाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी येथे वासन आय केअर हॉस्प्लिटलची 96 लाख रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने हडपसर पोलिस ठाण्यात त्यावेळी कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीधर नकुल यादव, पोलिस कर्मचारी गणेश मोरे यांच्यासह दोघांना 3 वर्षाची शिक्षा आज (मंगळवारी) सुनावली आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59ad977f-b024-11e8-9359-a7e57356dc28′]

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर 2015 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक यादव यांच्यासह चौघांविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक गिरीधर यादव, कर्मचारी गणेश मोरे, अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने यांना त्यावेळी पोलिसांनी अटक केली होती. वासन आय केअरचे विशाल देविदास भेंडे (33, रा. पांडवनगर) हे कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये चालक म्हणुन करीत होते. यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मराठी बातम्या तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा
policenama App …प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

वासन आय केअरच्या पुण्यात कोथरूड, सदाशिव पेठ आणि मगरपट्टा येथे शाखा आहेत. इनोव्हाचालक विशाल धेंडे हे हॉस्पिटलची रोकड मगरपट्टा येथे घेवुन गेले होते. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक गिरीधर यादव, कर्मचारी गणेश मोरे आणि इतरांनी धेंडे यांना दमबाजी करत तसेच इनोव्हामध्ये हत्यार असल्याच्या बहाण्याने थांबविले त्यानंतर चौघांनी मिळुन इनोव्हामध्ये असलेले 96 लाख रूपये लुटले होते. त्यावेळी पुण्यात प्रचंड खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासामध्ये इनोव्हा चोरटयांनी लुटल्याचा बनाव देखील करण्यात आला. मात्र, नंतर सहाय्यक निरीक्षक यादव, कर्मचारी मोरे आणि इतरांनी संगणमत करून इनोव्हामधील रक्‍कम लुटल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली. त्यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’63296b4b-b024-11e8-b7df-9bc3e365856f’]

खटला लष्कर येथील न्यायालयात चालला. लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी येथे चाललेल्या खटल्यात सहाय्यक निरीक्षक यादव यांना दिलासा मिळाला. मात्र, खटला पुन्हा शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात चालविण्यात आला. दरम्यान, सत्र न्यायालयाने सहाय्यक निरीक्षक गिरीधर यादव, पोलिस कर्मचारी गणेश मोरे, अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने यांना 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 96 लाख लुटीच्या प्रकरणात सहाय्यक निरीक्षकासह पोलिस कर्मचार्‍याला शिक्षा ठोठावण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Please Subscribe Us On You Tube
Policenama News