कमी दरात धान्य मिळवण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक ! लगेच करा ‘हे’ काम नाहीतर होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकरानं वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू केली आहे. याद्वारे आपल्या रेशन कार्डवर देशाच्या कोणत्याही भागात राहणारी व्यक्ती सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) स्वस्त दरात धान्य मिळवू शकते. यासाठी आपलं आधार कार्ड आपल्या रेशन कार्डसोबत लिंक करणं गरजेचं आहे. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आहे. आता या कामासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक आहेत.

केंद्रानं दिल्या राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांना सूचना
जर तुम्ही दिलेल्या वेळेत आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केलं नाही तर पीडीएसकडून तुम्हाला फक्त 30 सप्टेंबर पर्यंतच धान्य मिळेल. म्हणून तातडीनं आधार कार्ड रेशन कार्डशी लिकं करणं गरजेचं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार , अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रलयानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, खऱ्या लाभार्थींना आधार लिंक न केल्यास त्यांना धान्य देऊ नका. त्यांचे नाव रेशन कार्ड पीडीएसमधून काढले जाऊ शकत नाही.

ऑनलाईन कसं लिंक कराल आधार आणि रेशन कार्ड ?
यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा आणि स्टार्ट नाऊ या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर आपल्या पत्त्याशी संबंधित तपशील भरा.

बेनिफिट प्रकारात रेशन कार्डचा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये दिलेली योजना निवडा.

ओटीपी पडताळणीनंतर तुमच्या रेशन कार्डला तुमच्या आधार सोबत लिंक केलं जाईल.

ऑफलाईन कसं लिंक कराल आधार आणि रेशन कार्ड ?
जवळच्या पीडएस केंद्र किंवा पीडीएस शॉपला भेट द्या. आधार कार्डची फोटो कॉपी, घर प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे शिधा कार्ड घ्या.

जर तुमचं बँक खातं तुमच्या आधारसोबत लिंक नसेल तर तुम्हाला बँक खात्याची फोटोकॉपीही द्यावी लागेल.

ही सर्व कागदपत्रे पीडीएस केंद्रात आपल्या आधारच्या फोटोसह सबमिट करा. सर्व कागदपत्रे स्विकारल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.

यानंतर आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like