ओएलएक्सवर दुचाकी खरेदीच्या बहाण्याने ३० हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ओएलएक्सवर दुचाकी विक्रीच्या बहाण्याने तरुणाला तीस हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

तेजपाल  सिंग व त्याचा मित्र अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर वसीम मौला शेख (३३, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम शेखला दुचाकी खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने ओएलएक्सवर दुचाकी विक्रीला असल्याची जाहिरात पाहिली. त्यानंतर ती दुचाकी खरेदी करण्यासाठी त्यांनी संपर्क साधला. संबंधिताने त्यांना दुचाकीबद्दल माहिती दिली. तसेच एका तासात दुचाकीची डिलीव्हरी देतो असे सांगून तीस हजार रुपये तात्काळ खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानंतर वसीम शेख यांनी तेजपाल सिंग व त्याच्या मित्रावर विश्वास ठेवून लगेचच ३० हजार भरले. परंतु तो दुचाकी घेऊन काही आलाच नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले, तेही दिले नाहीत. म्हणून पोलीस ठाण्यात धाव घेतली, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. काटे करत आहेत.