नामांकित जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात काम नामांकित कंपनीत काम करणाऱ्या मुलीने आत्महत्या केली असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भूमिका सिंह असे या तरुणीचे नाव असून ती ३० वर्षांची आहे.

मुंबईच्या संताक्रुझ परिसरात वाकोला या भागात भूमिका  सिंह या वास्तव्याला होत्या. कामा निमित्त भूमिकाचा पती विनय सिंह हा दोन दिवस बाहेर गेला होता. काम आटपून घरी परतला असता त्याला आपली पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघायला मिळाली त्याने लगेच पोलिसांना फोन लावून बोलावले. पोलीस घटना स्थळी दाखल होताच त्यांनी घराची कसून तपासणी केली. तर त्यांना घरात कोठेच आत्महत्येचे कारण दर्शनवणारी चिठ्ठी मिळाली नाही. त्यामुळे याला आत्महत्या म्हणायचे कि हत्या हा पोलिसांना प्रश्न आहे. पोलीसांनी त्यांचे तपासकार्य सुरु केले असून त्यांनी  यासंदर्भात अधिकची माहिती दिली नाही.

भूमिका सिंह हि एका आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत काम करते सध्या ती मुंबईतील या आंतरराष्ट्री कंपनीच्या मुंबईमधील ऑफिसमध्ये काम करते. तिच्या आत्महत्येचे कारण नेमके काय आहे हे कोणालाच कळाले नसले तरी तिला कामावर कसला त्रास होता का? तिचा पती तिला त्रास देत होता का? तसेच अन्य काही कारणाने ती त्रस्त होती. या पैकी तिच्या आयुष्यात नेमके काय घडत होते हे पोलीस सध्या तपासून पाहत आहेत. तिच्या पतीने दिलेल्या माहिती नुसार तो दोन दिवसा पूर्वी घरातून बाहेर पडला तेव्हा तर ती खूप खुश होती तिने तिच्या पतीला हसत हसत निरोप  दिला. आपल्या पत्नी बद्दल आपणाला घरी येऊन असे बघायला मिळेल हे आपण स्वप्नात हि चिंतीले नव्हते असे मृत भूमिकाचा पती म्हणाला आहे.

पोलीस आता घटनेची  कसून तपासणी करत असून मृत भूमिकेच्या आत्महत्ये मागील कारण उकलण्याचा प्रयत्न  करत आहेत. अल्प पुराव्याच्या आधारावर तपास लावण्याची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. तरी घटनेचा तपास आम्ही अल्पावधीतच पूर्ण करू असे पोलीसांनी सांगीतले आहे.