एसटीत काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्य परिवहन महामंडळात (एसटी) बसवाहकाचे काम देण्याच्या बहाण्याने वसईत राहणार्‍या 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणी एका प्रसिद्ध कंपनीत काम करते. तिची ओळख सातिवली येथे राहणार्‍या एका तरुणाशी झाली. या तरुणाने तिचा विश्वास संपादन करून तिला राज्य परिवहन महामंडळात (एसटी) महिला बसवाहक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले.

आरोपीने तरुणीला नोव्हेंबर 2019 ते जून 2020 या काळात तिला वारंवार सातिवली येथील घरी येण्यास भाग पाडले. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केले. मात्र तो नोकरी लावत नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने जाब विचारला असता आरोपीने तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, विरारमध्ये एका नोकराने मालकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. विरार पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विरारमध्ये एका बंगल्यात मनीष दुरगज (25) हा नोकर म्हणून काम करत होता. त्याने 24 मे रोजी मालकाच्या 15 वर्षीय मुलीला घरात कुणी नसताना फूस लावून टेरेसवर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.