धक्कादायक ! लॉकडाउनमध्ये रस्ते अपघातांत 300 जणांचा मृत्यू

पोलिसनाम ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्रा, वाहनांची उपलब्धता न झाल्यामुळे अनेकांनी पायी जाण्यास पसंती दिली होती. त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. गेल्या महिन्यात, एप्रिलमध्ये राज्यभरात 576 अपघाताच्या घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये 300 हून अधिक जणांचा मृत्यू झालाआहे. तर 274 जण गंभीर जखमी झाले. अत्यावश्यक सेवेसाठीची वाहतूकच सुरू असताना झालेल्या या अपघातांत मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे ही शहरे आघाडीवर आहेत.

लॉकडाउनमध्ये अनेकांनी मिळेल त्या वाहनांने घरी जाण्यास पसंती दिली आहे. तर रेल्वे, बस, आणि खासगी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे काहींनी चालतच गावचा रस्ता धरला आहे. शहर व ग्रामीण भागातही टाळेबंदीचा नियम नागरिकांकडून पाळला जात नाही आणि सर्रास वाहने बाहेर काढली जात आहेत. रस्ते, महामार्ग मोकळे असल्याने बेदरकारपणे वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, मोबाइलवर बोलताना वाहन चालवण्याचे प्रकार होत असून त्यामुळेच अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. त्यातच रस्त्यावर वाहनेच नसल्याने काही शहरी भागांतील सिग्नल यंत्रणाही बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना बेदरकारपणे वाहन चालवण्यासाठी आणखी मोकळीक मिळाली. राज्यात एप्रिल 2020 मध्ये 576 अपघात झाले. यामध्ये 280 प्राणांतिक अपघातांत 261 पुरुष आणि 39 महिलांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.

जिल्हा एकूण अपघात एकूण मृत्यू एकूण जखमी

मुंबई                        40 11 35

ठाणे (शहर)              22 1 21

ठाणे (ग्रामीण)           11 08 5

नवी मुंबई                  14 5 16