खुशखबर ! महिन्याला ‘फक्त’ ५५ रुपये भरा अन् मिळवा, ‘दरमहा’ हजारोंची ‘पेंशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी असून रिटायरमेंटनंतर सुरक्षेसाठी हिचा वापर होऊ शकतो. यात अधिक करुन रिक्षा चालक, मिड डे मिल कर्मचारी, विटा भट्यांवर काम करणारे कामगार, घरकाम करणारे कामगार, शेतात काम करणारे कामगार, कंस्ट्रक्शन करणारे कामगार यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता –
कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत.
१. असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक

२. वय १८ ते ४० वर्ष यामध्ये असणे आवश्यक

३. मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी

४. संघटित क्षेत्राशी जोडलेला नको.

५. करदाता नको. म्हणजेच उत्पन्नावर कर भरणारा नको.

फक्त ही दोन कागदपत्र हवीत –

१. आधार कार्ड

२. बँकेची माहिती (बचत खाते, जनधन खाते, आयएफएससी नंबर)

योजनेची विशेषता –
ही अशी योजना आहे ज्यात तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक करु शकतात. या अंतर्गत ६० वर्ष वयानंतर तुम्हाला प्रति महिना ३००० रुपये पेंशन मिळेल. जर अर्जदाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला फॉमिली पेंशन म्हणून त्यातील ५० टक्के पेंशन सुरु होते.

असा घ्या लाभ –
असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जवळच्या नागरी सेवा केंद्रात किंवा कॉमन सर्विसेज सेंटर मध्ये जायचे आहे. तेथून आधार कार्ड आणि बचत खात्याच्या क्रमांकाचा वापर करुन पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करता येतो.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी