Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 3041 नवे रूग्ण तर 58 जणांचा बळी, बाधितांचा आकडा 50000 पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात विक्रमी 3041 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50 हजाराच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्या समोरील चिंता वाढत चालली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3041 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. राज्यात गेल्या 24 तासत 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1635 झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्य़ंत राज्यात 14600 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 50231 झाली असून यामध्ये 33988 अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण मुंबई, उपनगर आणि पुण्यामध्ये सर्वाधिक आहेत. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कठोर पावलं उचलली जात आहे. मुंबईत कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावी मध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.