कामाची गोष्ट ! 31 जुलै शेवटची तारखी, यानंतर तुम्ही नाही करू शकणार ‘ही’ 4 महत्वाची कामे, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जुलै महिना संपण्यास 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 जुलै रोजी अशा अनेक गोष्टींची अंतिम मुदत संपत आहे जी तुमच्या खिशासंबंधित आहे.

– मागील काही दिवसांपूर्वी सरकारने 25 मार्च 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत ज्या मुली 10 वर्षांच्या झाल्या आहेत, त्यांना सुकन्या समृद्धि योजनेत (एसएसवाय) 31 जुलैपर्यंत खाते उघडण्याची मुदत दिली होती. लॉकडाऊनमुळे सुकन्या समृद्धि खाते न उघडू शकलेल्या मुलींच्या पालकांना ही सूट मिळण्यास मदत होणार आहे.

– त्याचप्रमाणे सरकारने पीपीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2019-20 साठी आपल्या खात्यात 31 जुलैपर्यंत रक्कम जमा करण्याची परवानगी दिली आहे.

– जर तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष 2018-19 साठी मूळ किंवा सुधारित प्राप्तिकर परतावा भरला नसेल तर लवकरच तो निकाली काढा. वास्तविक आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै रोजी संपत आहे. हे त्या करदात्यांसाठी आहे ज्यांनी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत रिटर्न भरले नव्हते. अशा करदात्यांना 10,000 रुपयांपर्यंतच्या दंडासहित 31 मार्च 2020 पर्यंत परतावा भरायचा होता. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 31 मार्च 2020 ची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढविली होती. आता पुन्हा एकदा 31 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

– आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान करात सूट मिळण्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूकीची अंतिम मुदत 31 जुलै 2020 आहे. याचा अर्थ असा की आपण कलम 80सी (जीवन विमा, पेन्शन फंड, बचत पत्र इ.), 80डी (वैद्यकीय विमा) आणि 80जी (देणगी) अंतर्गत 31 जुलै 2020 पर्यंत कर गुंतवणूक करून यांवर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कर सवलतीत दावा करू शकता.