Hyderabad Rains : तेलंगनासह आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात पावसादरम्यान झालेल्या दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू, आजही अलर्ट

नवी दिल्ली : तेलंगना आणि आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी पावसाशी संबंधीत घटनांमध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला, तर कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस झाला. पश्चिम बंगालमध्ये तयार झालेले जास्त दाबाचे क्षेत्र काकीनाडा किनार्‍यावरून गेल्याने दक्षिणेतील राज्यांमध्ये मोठा विध्वंस झाला. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भिंत पडल्याने एकाच कुटुंबातील चार लोकांसह सहा लोकांचा मृत्यू झाला.

हैद्राबादमध्ये मुसळधार पावसामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला. शहराच्या काही सखल भागात रस्यांवर पाणी साचले होते. आंध्र प्रदेशात मागील 48 तासात पावसाशी संबंधीत घटनांमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधानांनी दिला मदतीचा विश्वास
पंतप्रधानांनी जोरदार पावसाने प्रभावित दोन्ही दक्षिणी राज्यांना बचाव आणि मदत कार्यात केंद्राकडून प्रत्येक मदत करण्याचे आश्वासन दिले. हैद्राबादमध्ये मृत्यूची बहुतांश प्रकरणे मुसळधार पावसाने भिंत आणि घरे कोसळल्याने झाल्याचे समोर आले आहे.

तेलंगना सरकारने मुसळधार पावसामुळे बुधवार आणि गुरूवारी येथील बाह्य रिंग रोडच्या क्षेत्रात येणार्‍या खासगी संस्था आणि कार्यालयांना सुट्टी ेदेण्याची घोषणा केली.

लोकांना घरात राहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शमशाबादच्या गगनपहाड परिसरात घर कोसळ्याने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एका बालकाचा समावेश आहे. चंद्रायनगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिंत कोसळल्याने दहा लोकांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी मुसळधार पावसामुळे इब्राहिमपट्टनम परिसरात एका जुन्या घराचे छत कोसळल्याने 40 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला.

अधिकृत आकड्यांनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत मेडचल मल्काजगिरी जिल्ह्याच्या सिंगापुर टाऊनशिपमध्ये 292.5 मिमी पाऊस झाला आणि यदाद्री-भोंगीर जिल्ह्याच्या वर्केल पाल्लेमध्ये 250.8 मिमी पाऊस नोंदला गेला.

ग्रेटर हैद्राबाद महापालिका क्षेत्रात मोठे नुकसान
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ग्रेटर हैद्राबाद महापालिका परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. पोलीस दली आणि एनडीआरएफ तसेच जीएचएमसीच्या आपत्ती कृती दलाने (डीआरएफ) त्या ठिकाणांवरून अनेक कुटुंबांना बाहेर काढले, जेथे पाणी भरले होते. अनेक भागात बचाव कार्य सुरू आहे.

दरम्यान, महापालिका आणि पोलिसांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले. जीएचएमसी आयुक्त डीएस लोकेश कुमार यांनी नादुरूस्त इमारती आणि झोपड्यांमध्ये राहणार्‍या लोकांना परिसरात रिकामा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, लोकांनी तात्पुरत्या राहाण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. कर्नाटकात कावेरी नदीच्या सर्व धरणांच्या पाण्याची पातळी खुपच जास्त आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, कलबुर्गी, यादगीर आणि बीदर पाण्याच्या अति प्रभावामुळे प्रभावित झाले आहे. जिल्ह्यातील आलंद तालुक्तात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी म्हटले की, या वर्षी ला नीना च्या स्थितीमुळे थंडी जास्त असू शकते.