Corona Vaccine Dry Run : देशभरात आजपासून कोरोना व्हॅक्सीनची ‘ड्राय रन’, लोकांपर्यंत व्हॅक्सीन ‘या’ पद्धतीने पोहचवणार सरकार

नवी दिल्ली : भारत जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाची तयारी करत आहे. यासाठी सरकारकडून फुलप्रूफ प्लॅनिंग करण्यात आले आहे, व्हॅक्सीन सामान्य लोकांपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय कसे पोहचेल. याबाबत न्यूज18 शी चर्चा करताना नॅशनल कोविड टास्क फोर्सचे हेड डॉ. विनोद पॉल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

30 कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल
विनोद पॉल यांनी सांगितले की, कोविड लसीकरणसाठी सरकार, इंडस्ट्री आणि अन्य स्टेकहोल्डर्स एकत्र मिळून टीमप्रमाणे काम करत आहेत. पहिल्या फेजमध्ये देशातील तीस कोटी लोकांना लसीकरण करण्यात येईल. यास प्राथमिकतेच्या आधारावर निवडण्यात आले आहे.

अशी व्हॅक्सिनेशन पॉईंटपर्यंत पोहचणार कोविड व्हॅक्सीन
व्हॅक्सीन सप्लाय सिस्टमबाबत डॉ. पाल यांनी म्हटले की, देशात याचे 31 मोठे स्टॉक हब असतील. या स्टॉक हबमधून सर्व राज्यांच्या 29 हजार व्हॅक्सिनेशन पॉईंटपर्यंत व्हॅक्सीनचा पुरवठा केला जाईल. सरकारने स्पष्ट केले आहे की लोकांच्या लसीकरणात आर्थिक बाबींचा अडथळा येऊ दिला जाणार नाही.

मृत्यू कमी करण्यासाठी हाय रिस्क ग्रुपचे प्रथम लसीकरण
डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले की, सध्या व्हॅक्सिनेशनबाबत फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ लोकांना प्राथमिकता आहे. देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पहिल्या टप्प्यात केले जाणार नाही. कोरोनामुळे कमीत कमी मृत्यू व्हावेत यासाठी हाय रिस्क असलेल्या लोकांचे लसिकरण पहिल्यांदा केले जाईल.

गुरुवारी एक्सपर्ट पॅनलने सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाची व्हॅक्सीन कोविशील्डला इमर्जन्सी वापरासाठी मंजूरी दिली आहे. आता डीजीसीएला यावर निर्णय घ्यावा लागेल. ब्रिटनमध्ये या व्हॅक्सीनला इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मिळाली आहे.