मोदी सरकारकडून ३१२ ‘कामचोर’, ‘निष्क्रीय’ सरकारी कर्मचार्‍यांना ‘नारळ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकराने आपले दुसऱ्या टर्मच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे. संसदेतील अधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता मोदी सरकारने आपल्या कामात निष्काळजी पणा दाखवणाऱ्या ३१२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. मोदी सरकारने या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीचे निवृत्ती दिली आहे.

कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी, संयुक्त सचिव पदाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसंच ग्रुप बीच्या १८७ कर्मचारी तर गट एच्या १२५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी आपल्या कामात सत्यनिष्ठा आणि आपल्या कामाप्रति निष्काळजी दाखवत होते, म्हणून त्यांना काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जुलै २०१४ ते मे २०१९ च्या काळात ग्रुप ए च्या ३६००० आणि ग्रुप बीच्या ८२००० अधिकाऱ्यांच्या कामाचे विश्लेषण केले गेले. त्यानंतर ग्रुप एच्या १२५ आणि ग्रुप बी च्या १८७ अधिकाऱ्यांना निवृत्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

लोकसभेत बोलताना सरकारने या निर्णयावर स्पष्टीकरण दिले आहे. अनुशासनात्मक नियमानुसार सरकारकडे अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत पुरावे असल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक हितासाठी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सरकारला आहे. कामात कामचुकारपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय नागरी कायद्यानुसार सेवा नियम ४८, पेन्शन नियम १९७२ आणि नागरी सेवा नियम १६ (३) अंतर्गत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी ताकीद देऊन त्यांना वेळे आधी सेवावृत्ती देऊ शकते, असं सरकारने सांगितले.

दरम्यान, मोदी सरकारच्या या आक्रमक निर्णयामुळे इतर अधिकारी धास्तावले असून ते आता आपले काम इमानदारीने आणि काळजी पूर्वक करतील, असं म्हणायला हरकत नाही.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात