‘या’ कारणामुळं इराकमध्ये सरकारविरोधी प्रदर्शन, 300 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 1200 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराकच्या मानवाधिकार समितीने दिलेल्या अहवालानुसार गेल्या महिन्यात झालेला सरकारविरोधी आंदोलनामध्ये 319 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराकच्या लष्कराने शनिवारी बगदाद येथे चार आंदोलकांना मारले तसेच शेकडो आंदोलनकर्त्याना माघारी धाडले.

या व्यतिरिक्त, कित्येक तंबू जाळण्यात आले जे रात्र घालवण्यासाठी वापरले जात होते. ताहिर चौकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अल खालानी व्यावसायिक भागात इराकी सुरक्षा दलाकडून टीयर गॅस आणि थेट दारुगोळा वापरण्यात आला. इराकमधील मानवाधिकार समितीने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 1200 लोक जखमी झाले आहेत. शुक्रवारी देखील दक्षिण भागात झालेल्या हल्ल्यात लष्कराकडून दोन आंदोलन कर्त्यांचा मृत्यू झाला होता.

इराकी लष्कराकडून सोडण्यात आलेल्या गॅसमुळे 23 विद्यार्थी जखमी झाले होते. बगदाद तसेच इतर काही महत्वाच्या ठिकाणी बेरोजगारी, सरकारी भ्रष्टाचार आणि मूलभूत गरजांची कमतरता यामुळे अनेक जण सरकार विरोधातील आंदोलनामध्ये सामील होत आहेत. अनेक लोकांनी या परिस्थितीसाठी राजकीय पक्षांना कारणीभूत धरले आहे. 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या नंतर झालेले आतापर्यंतचे सगळ्यात मोठे आंदोलन आहे. ज्यामुळे सरकारला देखील मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी झालेल्या हिंसक प्रदर्शनाबद्दल इराकचे पंतप्रधान अदील अब्दुल महदी यांनी म्हंटले की, याबाबत सरकार महत्वाच्या मंत्रिपदांमध्ये बदल करणार आहे. इराकमधील युवा पिढी येथील आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. सरकार विरोधी सतत चाललेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान राजीनामा देणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com