प्रलंबित शिधापत्रिका ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – नवीन शिधापत्रिका तसेच फाटलेल्या आणि खराब झालेल्या शिधापत्रिका देण्यास महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून विलंब होत आहे. किंबहुना अधिकारी हे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्याचबरोबर ठराविक कालावधीत नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळत नाही. शिधापत्रिकेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिक पुरवठा विभागात हजारो चकरा मारत असतात. त्याचबरोबर काही कुटुंबे हि वेगळी झाल्यानंतर नवीन शिधापत्रिका बनवत असतात. मात्र यासाठी त्यांना खूप काळ वाट पाहावी लागते. त्यामुळे आता पुरवठा विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना ३१ ऑगस्ट हि शेवटची तारीख देण्यात आली आहे.

सर्वच प्रकारच्या कामांसाठी पुरवठा विभागाने कालावधी ठरवून दिलेला असताना या विभागांमध्ये नागरिकांना वेळेवर सेवा दिली जात नाही. त्याचबरोबर दर महिन्याच्या ५ तारखेला याविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली नाही.

शिधापत्रिकेचे नूतनीकरण, विभक्तीकरण, गरजूंना नवीन शिधापत्रिका देण्यासाठी कालावधी आणि पद्धत ठरवून देण्यात आली आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या शिधापत्रिकांच्या कामामध्ये संयुक्त कुटुंबाला विभक्त शिधापत्रिका देण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात विलंबित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दाखल पुरवठा विभागाने घेतली असून कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.

म्हणून मिळेल शिधापत्रिका बदलून

जर तुमची शिधापत्रिका हि जीर्ण झाली असेल, फाटली असेल किंवा खराब झाली असेल तर तुम्हाला शिधापत्रिका बदलून घेण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर तुम्ही एखादे नाव कमी केले असेल किंवा कुटुंब विभक्त झाल्यानंतर पुरवठा विभाग तुम्हाला नवीन शिधापत्रिका देत असते. मात्र सरकारी कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन कराव्या लागण्याच्या अनेक तक्रारी आल्याने पुरवठा विभागाने हि बाब गांभीर्याने घेतली असून या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –