दिल्लीतील भाजी मंडईत भीषण आग, 32 जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ५० हून अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

राणी झासी रोडवरील भाजी मंडई भागातील घरांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी घरात अडकलेल्या सुमारे ५० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अरुंद गल्ल्या आणि सकाळीच लागलेल्या आगीत अनेक जण झोपेत होते. त्यामुळे आग व धुरामुळे त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही. अनेकांचा भाजून तसेच गुदमरुन मृत्यू झाला.

आगीतून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या आगीत किमान २०जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या २५ पर्यंत वाढू शकत असल्याचे येत आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like