फक्त 32 टक्के महिला लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार करतात: सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सध्या देशभरात आणि सोशल मीडियावर #MeToo मोहिमेमुळे चागंलेच वादळ उठले आहे. अनेक महिला त्यांच्यावरील गैरवर्तनाबद्दल आवाज उठवत असताना दिसत आहेत.  त्यांना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडत आहेत. ही संख्या जरी मोठी असली तरी प्रत्यक्षात केवळ 32 टक्के महिला लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार करतात. एका आॅनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. 78 टक्के महिला या कामाच्या ठिकाणी झालेल्या गैरवर्तणुकीबाबत कुठेच वाच्यता करत नाही असे तथ्य समोर आले आहे. सर्वेक्षणात सामील झालेल्या पीडित महिला म्हणाल्या की परवानगीशिवाय स्पर्श करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

लोकल सर्कल या कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात 28 हजार प्रतिक्रिया कंपनीला मिळाल्या. त्यानुसार परवानगीशिवाय स्पर्श केल्याची तक्रार 50 टक्क्याहून अधिक महिलांनी केली आहे. तर अश्लील शेरेबाजी आणि जबरदस्तीने पॉर्न दाखवल्याची व्यथा 31 टक्के महिलांनी मांडली आहे. तर 19 टक्के महिलांकडे सरळ शरीरसुखाची मागणी केली होती. नाना आणि तनुश्री वादानंतर आणि Metoo मोहीम सुरू झाल्यानंतर हे सर्वेक्षण केले गेले.

[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c254f925-d22d-11e8-b33f-3d57c0fbc3a0′]
20 टक्के महिलांना कार्यालयीन वेळेनंतर किंवा कार्यक्रमादरम्यान या लैंगिक गैरवर्तणुकीचा सामना करावा लागला आहे. रात्री उशिरा थांबणार्‍या महिलांसोबत लैंगिक गैरवर्तणूक होते असा समज रूढ आहे. परंतु कार्यालयीन कामकाजादरम्यान सर्वाधिक गैरवर्तणुक झाल्याचे समोर आले आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 22 टक्के महिलांनी याविरोधात तक्रार केल्याचे म्हटले आहे, तर 78 टक्के महिलांनी याबाबत कुठेच तक्रार केली नसल्याचे कबुल केले आहे. कामाच्या वेळी लैंगिक गैरवर्तणूक झाल्याचे 32 टक्के महिलांनी सांगितले तर 23 टक्के महिलांनी याबाबत मौन पाळले. तर 45 टक्के महिलांनी असे कुठलेच गैरवर्तणूक न झाल्याचे सांगितले आहे.