‘वीर’मधून नीरा नदीत पुन्हा 32 हजार 509 ‘क्युसेक्स’ पाण्याचा ‘विसर्ग’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या पंधरा – वीस दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग वीर धरणात आला. त्यामुळे फुल झालेल्या वीर धरणातून बुधवारी (दि.४) ३२ हजार ५०९ क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडण्यात आले. परिणामी वीस-बावीस दिवसानंतर नीरा नदी पुन्हा दुधडी वाहू लागली आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा पाऊस सुरू झाल्याने बुधवारी (दि.४) सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत वीर धरणाच्या पाच दरवाजातून २३ हजार १८५ क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता. परंतु वरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत जात असल्याने नीरा देवघर धरणातून ७ हजार ३२० क्युसेक्स, भाटघर धरणातून ५ हजार ११० क्युसेक्स तर, गुंजवणी धरणातून २ हजार ५३७ क्युसेक्स पाणी वीर धरणात सोडण्यात आल्यामुळे बुधवारी सायंकाळी पाच वाजता वीर धरणांच्या सात दरवाजातून ३२ हजार ५०९ क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे वीस ते बावीस दिवसाच्या कालखंडानंतर नीरा नदी पुन्हा दुथडी वाहू लागल्याने नीरा नदीकाठी असलेल्या प्रसिद्ध दत्तमंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या असून दशक्रिया विधी घाटही पाण्याखाली गेला आहे.

दरम्यान, नीरा नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे व शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –