Coronavirus : रात्री आढळले 18 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील ‘कोरोना’बधितांचा आकडा 320 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोना बाधित असल्याचे १८ जण नव्याने निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ३२० झाली आहे. गेल्या २४ तासात किमान १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने कोरोनाबाधित झालेल्या १८ पैकी १६ जण मुंबईतील असून दोघे जण पुण्यातील आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३२० झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक कोरोना बाधित हे मुंबईतील आहेत. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १६७ इतकी झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० झाली आहे.

मुंबईत काल एका दिवसात ५९ जणांना नव्याने लागण झाल्याचे आढळून आले होते. आज सकाळी आणखी १६ जणांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे २४ तासात मुंबईत तब्बल ७५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एका दिवसात इतकी संख्या वाढल्याने मुंबई विषयी चिंता वाढली आहे. अनेक राज्यांपेक्षा एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यु झाला आहे.