वीर धरणातून गुरूवारी रात्री 32368 क्युसेक्सने नीरा नदीत ‘विसर्ग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा खो-यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पुणे, सातारा, सोलापुर जिल्हाला वरदाण ठरलेल्या वीर धरण ओव्हरफ्लो च्या मार्गावर आहे. तसेच गुरूवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसाचे पाणी वीर धरणात येत असल्यामुळे पाणी पातळी वाढत आहे.

त्यामुळे गुरूवारी (दि.१३) रात्री साडेसात वाजता वीर धरणाचे सात दरवाजे चार फुटांनी उचलून ३२ हजार ३६८ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याची माहिती वीर धरण प्रशासनाकडून रात्री देण्यात आली. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुणे – सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीवरील प्रसिद्ध दत्त मंदीर पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नदी काठच्या रहिवांशानी सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे.