Coronavirus : चिंताजनक ! ‘कोरोना’चा कहर सुरूच, 24 तासांच्या आत 11502 नवे पॉझिटिव्ह तर 325 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर सध्या थांबत नसल्याचे दिसत आहे. संक्रमित रूग्णांची संख्या देशात वेगाने वाढत आहे. सोमवारी देशाच्या विविध राज्यात कोरोना व्हायरसच्या एकुण 11502 नव्या केस समोर आल्या. या नव्या प्रकरणांनंतर कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 332424 झाली आहे. तर मागच्या 24 तासांच्या आत देशात कोरोना व्हायरसमुळे 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 9520 लोकांचा बळी घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी कोरोना व्हायरसचे आकडे जारी करत म्हटले की, आतापर्यंत 169798 रूग्ण बरे सुद्धा झाले आहेत, ज्यानंतर अ‍ॅक्टिव्ह केस 53106 झाल्या आहेत. तर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने सांगितले की, 15 जूनच्या सकाळी 9 वाजेपर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या एकुण 57,74,133 सॅम्पल टेस्ट झाल्या आहेत, ज्यापैकी 1,15,519 सॅम्पल टेस्ट मागच्या 24 तासांच्या आत करण्यात आल्या आहेत.