Coronavirus : राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 781 वर, 33 नवे रूग्ण आढळले

 पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. विशेषतः महाराष्ट आणि केरळसह दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संबंधित राज्य सरकार चितेंत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेले कोरोनाचे रूग्ण 781 च्या झाले आहेत. एकाच दिवसात 33 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या 19, मुंबईच्या 11 आणि अहमदनगर, सातारा आणि वसईच्या प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

कोरोना व्हायरस मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ वेगाने पसरत होता. मात्र, महिन्याच्या अखेरीस व्हायरसने वेगाने उसळी घेतली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या चिंतेत भर पडली. दुसरीकडे मृत्यूदरही वाढला असून महाराष्ट्रातील परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

केंद आणि राज्य सरकारकडून वारंवार जनजागृती करुनही काही नागरिक अजूनही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेेणे आवश्यक आहे. दरम्यान, 14 तारखेपर्यंत कोरोनाचा वेग कमी न झाल्यास लॉकडाउन आणखी वाढविण्याचा विचार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी काही दिवसांपुर्वी दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चितेंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.