ठाणे जिल्ह्यात ‘कोरोना’चे 331 नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 331 नवीन रुग्ण सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 41 हजार 473 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 5 हजार 924 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे शहरामध्ये 95 रुग्ण आढळून आले असून शहरात आतापर्यंत 54 हजार 878 रुग्ण आढळून आले आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 302 एवढी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत 100 रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत 57 हजार 66 बाधीत असून 1 हजार 96 मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये 11 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. शहरात 11 हजार 308 बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर 351 मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात 30 रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात 25 हजार 237 बाधीत आढळून आले आहेत. तर 782 जणांचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ शहरात सात रुग्ण आढळून आले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. या शहरात 8 हजार 214 बाधितांसह मृतांची संख्या 300 आहे. बदलापूरमध्ये आज 12 रुग्ण सापडले असून आतापर्यंत 8 हजार 700 बाधीत रुग्णांची संख्या झाली आहे. तर मृतांची संख्या 114 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. या गांवपाड्यांत आतापर्यंत 18 हजार 703 बाधीत रुग्ण संख्या झाली आहे. तर 578 जणांचा मृत्यू झाला आहे.