सावधान ! जोकर मॅलवेअर मिळाल्यावर Google नं या 34 घातक Apps ला प्ले स्टोरवरून हटवलं, तुम्ही देखील तात्काळ डिलीट करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगलने जुलै ते सप्टेंबर दरम्यान प्ले स्टोअर वरून अशी 34 ॲप्स डिलीट केले आहे ज्यामध्ये जोकर मेलवेअर आढळले आहे. जोकर हा एक धोकादायक व्हायरस आहे ज्याने गेल्या काही महिन्यांपासून बर्‍याच ॲप्सला प्रभावित केले आहे. गूगलला ज्या-ज्यावेळी ॲपच्या परिणामाबद्दल समजले त्या-त्यावेळी त्याने प्ले स्टोअर त्या ॲप्सला डिलीट केले आहे. हा जोकर मेलवेअर एक प्रकारचा मॅलिशियस बॉट आहे, जो फ्लायवेअर म्हणून कॅटेगरीज केला गेला आहे.

या मेलवेअरचे कार्य SMS वर बनावट क्लिक करणे आहे, ज्याद्वारे युजर्सच्या अकाउंटमधून अवांछित प्रीमियम सशुल्क सेवेची सदस्यता घेतली जाते. युजर्सला याबद्दल कोणतीही माहिती नसते. हे स्पायवेअर SMS, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनची माहिती चोरण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

हे मेलवेअर युजर्सला प्रीमियम वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल WAP सेवेसाठी गुप्तपणे साइन – अप करण्याची अनुमती देते. चला 34 ॲप्सची यादी पाहूया

>> All Good PDF Scanner
>> Mint Leaf Message-Your Private Message
>> Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons
>> Tangram App Lock
>> Direct Messenger
>> Private SMS
>> One Sentence Translator – Multifunctional Translator
>> Style Photo Collage
>> Meticulous Scanner
>> Desire Translate
>> Talent Photo Editor – Blur focus
>>Care Message
>> Part Message
>> Paper Doc Scanner
>> Blue Scanner
>> Hummingbird PDF Converter – Photo to PDF
>> All Good PDF Scanner
>> com.imagecompress.android
>> com.relax.relaxation.androidsms
>> com.file.recovefiles
>> com.training.memorygame
>> Push Message- Texting & SMS
>> Fingertip GameBox
>> com.contact.withme.texts
>> com.cheery.message.sendsms (two different instances)
>> com.LPlocker.lockapps
>> Safety AppLock
>> Emoji Wallpaper
>> com.hmvoice.friendsms
>> com.peason.lovinglovemessage
>> com.remindme.alram
>>> Convenient Scanner 2
>> Separate Doc Scanner

फोनमधून करा डिलीट
गुगलने याला ‘Bread’ (Joker) म्हणून स्पॉट केले आहे, जे केवळ SMS च्या फसवणूकीसाठी डिझाइन केलेले ॲप्स आहे. हे अ‍ॅप्स आपल्या फोनच्या डेटासाठी अत्यंत धोकादायक आहेत, म्हणूनच आम्ही सल्ला देतो की, आपण यांना फोनमधून त्वरित डिलीट करावे.