PM केअर फंडासाठी बँका, वित्तसंस्थांकडून 349 कोटींची ‘वसुली’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या लढ्यासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडासाठी बँका, वित्तसंस्थांकडून भरघोस निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किमान सात बँका, अन्य सात वित्तीय संस्थांतील कर्मचार्‍यांच्या वेतनातून 349 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंड’मध्ये जमा केले आहेत.

कोरोनासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांनी सामाजिक दायित्व निधी आणि अन्य तरतुदींमधून स्वतंत्रपणे 144.5 कोटी रुपयांचे योगदान ‘पीएम केअर्स फंड’मध्ये दिले. त्याशिवाय 15 शासकीय बँका आणि वित्तसंस्थांनी एकूण 349.25 कोटी रुपये ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने सर्वाधिक म्हणजे 113.64 कोटी रुपये विविध वर्गवारीखाली ‘पीएम केअर्स फंडा’त जमा केले. त्यातील 8.64 कोटी कर्मचार्‍यांच्या वेतनातून देण्यात आले आहेत. तसेच 100 कोटी आणि 5 कोटींचा निधी महामंडळाने मार्चमध्ये दिला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये देणगीदारांत भारतीय स्टेट बँकेचा पहिला क्रमांक आहे. एसबीआयने या फंडात 107.95 कोटी रुपये जमा केले. ही सर्व रक्कम कर्मचार्‍यांच्या वेतनातून जमा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिझव्र्ह बँकेनेही कर्मचार्‍यांच्या वेतनातून 7.34 कोटी रुपये जमा केल्याचे म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like