Govt Accommodation In Maharashtra | काय सांगता ! होय, महाराष्ट्रातील 35 आयपीएस अधिकार्‍यांकडे 4 कोटी थकित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Indian Police Service – राज्याची आर्थिक तिजोरीत खडखडाट आहे. महसुलामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील तब्बल ३५ आयपीएस ( Indian Police Service ) अधिकाऱ्यांकडे सरकारचे ४ कोटी रुपये थकीत आहेत. मुदतीनंतरही शासकीय निवासस्थान न सोडलेली ही थकबाकी असून इंडियन एक्स्प्रेसने माहितीच्या अधिकाराखाली हि माहिती उघड केली आहे.

या थकबाकीदारांमध्ये मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांसह दोन अतिरिक्त महासंचालक आणि एका माजी महासंचालकस्तरीय अधिकाऱ्याचा समावेश आहे.
तर पुण्यातील राज्य सुरक्षा पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार बावीस्कर यांच्याकडे सर्वाधिक थकीत ७५.७७ लाख रुपये आहेत.

माहिती अधिकारात जी यादी प्राप्त झाली आहे त्यामधील बहुतेक थकबाकीदार म्हणजेच मुबंईत बदली झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना ही निवासस्थाने देण्यात आली होती.
नियमानुसार बदली झाल्यांनतर दिलेली निवासस्थाने सोडवी लागतात.
कारण नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावी लागतात.
जर कोणी हि निवसथाने रिकामी करत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. यादीमध्ये असे सहा आयपीएस अधिकारी आहेत कि त्यांच्याकडून सरकारला २० लाखाहून अधिक रक्कम द्यावयाची आहे.

त्यातील सर्वाधिक ७५.७७ लाखांची रक्कम संजयकुमार बावीस्कर (डीआयजी, राज्य सुरक्षा पोलीस दल, पुणे) यांच्याकडे थकित आहे.
बावीस्कर यांची २०११च्या मध्यावर बदली झाली होती.
तरीही त्यांनी मुंबईतील हजारहून अधिक फुटांचे निवासस्थानान ऑक्टोबर २०२० पर्यंत ताब्यात ठेवले होते.
यांदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही आपली वैयक्तिक बाब असल्याचे सांगितले तसेच याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

मुंबई मधून २०१६ मध्ये बदली झालेले मीरा-भाईंदर, वसई विरार अंतर्गत पोलीस उपायुक्तपदी असलेल्या महेश पाटील यांनी जून २०१९ पर्यंत मुंबईतील निवासस्थान सोडले नव्हते.
त्यांच्याकडून सरकारला ३३.७७ लाख रूपये येणेबाकी आहे.
त्यांनी मुलगा दहावीत शिकत होता; त्यामुळे हे निवासस्थान सोडता आले नाही, असे सांगितले.

निवृत्त आयपीएस अधिकारी सुरिंदर कुमार आणि धनंजय कमलाकर हे अनुक्रमे २५.७८ लाख आणि २२.८२ लाख सरकारला देणे लागत आहेत.
सुरिंदर कुमार यांनी मात्र आपण घराचा ताबा सरकारच्या परवानगीनेच ठेवल्याचे सांगितले.
कमलाकर यानी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
भ्रष्टाचारविरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे २०.७७ लाख रुपये थकित आहेत. ३० मार्च रोजी निधन झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्याकडे २०.१६ लाख थकित होते.

भाजपकडून लोकसभेवर निवडून गेलेले मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांना १२.९४ लाखांचा दंड करण्यात आला.
सिह यानं याबाबत विचारले असता, त्यांनी मुदतीपेक्षा अधिक काळ आपण कोणत्याही शासकीय निवासस्थानी वास्तव्य केलेले नसल्याचा दावा केला.
त्याचबरोबर त्यांनी मुंबईबाहेर बदली झाली तेव्हा संबंधित विभागाने थकबाकीचे काहीतरी चुकीचे गणित मांडले असावे अशी शक्यताही वर्तवली.

7 जून राशीफळ : आज मेष राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग, इतरांसाठी असा आहे सोमवार

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव