बुर्किना फासोमध्ये अंदाधुंद गोळीबार, मानवतावादी मदत देणार्‍या ताफ्यावरील हल्ल्यात 35 ठार

औगाडौगू (बुर्किना फासो) :  पोलीसनामा ऑनलाइन  –  बुर्किना फासोमध्ये अज्ञात बंदूकधार्‍यांनी गुरांच्या बाजारात अंदाधुंद गोळीबार केल्याने 35 लोकांचा मृत्यू झाला. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या अस्थिर देशात विशेषकरून हिंसक ठरलेल्या आठवड्याच्या अखेरीचा हा सर्वात हिंसक हल्ला होता. कॉम्पीएम्बीगा येथील जनावरांच्या बाजारात झालेल्या या हल्ल्यात बंदुकधारी बाईकवर बसून गोळीबार करत होते. यावेळी सुमारे 25 नागरिक, 7 पॅरामिलिटरी पोलीस आणि 4 असैन्य नागरिक ठार झाले. जेव्हा हा हल्ला सुरू होता तेव्हा मानवतावादी मदत करणारा ताफा फोऊबे येथून परतत होता.

सरकारी प्रतिक्रियेनुसार, देशाच्या उत्तर भागात, सनमातेंगामध्ये आणखी एका हल्ल्यात, मानवतावादी मदत करणार्‍या एका ताफ्यावर गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये 5 नागरिक आणि 5 सुरक्षा कर्मचारी ठार झाले. अनेक लोक बेपत्ता आहेत. दोन्ही हल्ले शनिवारी झाले. इस्लामी जहालमतवादी आणि त्यांच्याशी लढणारे स्थानिक सुरक्षा समुह आणि लष्कराशी संबंधीत हिंसा बुर्किना फासोमध्ये वाढत चालली आहे.

सुमारे 2,000 लोकांचा मागच्या वर्षी मृत्यू झाला होतो. या आठवड्याच्या शेवटी या हल्ल्यात एक दिवस आधीच उत्तर भागात 15 लोक मारले गेले होते. मोरक्कोचे थिंक टँक, पॉलिसी सेंटर फॉर न्यू साऊथचे वरिष्ठ फेलो, साहेल शोधार्थी रिदा ल्यामोरी यांनी म्हटले या नरसंहारामागे कोण आहे हे स्पष्ट नाही, परंतु असैन्य नागरिक पुन्हा एकदा हिंसक संघर्षात अडकले आहेत आणि मुख्य शिकार बनले आहेत.

अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, कोंपियेंगा प्रांतात शनिवारी जनावरांच्या बाजारात झालेला हल्ला जहालमतवाद्यांनी घडवून आणला. एका पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याने हल्लेखोरांची ओळख बुर्किनेब लष्कराचे सदस्य म्हणून केली आहे. दरम्यान, एका लष्करी अधिकार्‍याने मात्र यामध्ये लष्कराचा हात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला.