HM अमित शहांचा ‘विरोध’ करण्यासाठी 1 लाख कार्यकर्त्यांद्वारे तब्बल 35 KM ची ‘ब्लॅक वॉल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या पार्टीने अमित शाह यांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे ‘काळी भिंत’ उभारण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता 15 जानेवारीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यावेळी त्यांना यावेळी प्रचंड विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी देशात सीएएच्या विरोधात मोठे आंदोलन झाल्याचे पहायला मिळाले. मात्र केरळमधील कोझिकोडमध्ये 15 जानेवारीला अमित शाह यांच्या उपस्थित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे.

त्यामुळे याला विरोध म्हणून इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते कालिकट एअरपोर्ट ते वेस्टहिल हेलिपॅडच्या दरम्यान 35 किलोमीटरपर्यंत मानवी साखळी तयार करणार आहेत. विरोध दर्शवण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते काळे कपडे घालणार असल्याचे सांगितले जात आहे. विरोध प्रदर्शन दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान करण्यात येणार आहे.इंडियन युनियन मुस्लीम लीगने याबाबत सांगितले की, यावेळी सर्व कार्यकर्ते काळे कपडे परिधान करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करतील.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारी इंडियन युनियन मुस्लीम लीग पहिली राजकीय पार्टी आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिक ठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनांनी संपूर्ण देश ढवळून निघाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/