धुळे : बिट कॉईनच्या माध्यमातून ३५ लाखाची फसवणूक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बिटनेक्ट कंपनी आणि बनावट चीनी बेवसाइटच्या माध्यमातून नागरिकांना जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शहरातील एका नागरिकाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

सतिष कुंभानी, सुरेश गोरसीया, दिव्येश दर्जी, एजंट भाविन बोधारा (सर्व रा. सूरत, गुजरात) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुजित शरद साळुंखे (वय ३२ रा. मारवड ता. अमळनेर जि. जळगांव) यांनी फिर्याद दिली आहे. बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवल्यास ४० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अनेकांना गंडा घातला आहे.

आरोपींनी सुजित साळुंखे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बिटकॉईन मध्ये पैसे गुंतवून जास्त नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. आरोपींनी विशिष्ट प्लॅनमध्ये पैसे गुतवल्यास जास्त नफा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. साळुंखे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ३५ लाख रुपयांची गुंतवणुक केली. मात्र, गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने त्यांनी आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त – 

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

 वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

 चणे खा आणि ‘या’ गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवा

आहारातील तंतुमय पदार्थ करतात हृदयरोगां पासून बचाव