जि.प.मधील ३५ वर्षीय महिला लिपीकचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने प्रचंड खळबळ, प्रेमसंबंधातून खूनाचा संशय

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – नदीपात्रात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतमध्ये लिपीक म्हणून काम करणार्‍या महिलेचा तो मृतदेह असून तिचा गळा चिरून निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

चंद्रप्रभा अप्पलवार (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी हा खून प्रेमसंबंधातून झाला असावा असा अंदाज व्यक्त् केला आहे. गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्याच्या त्या मुळ रहिवासी होत्या. जिल्हा परिषदेत त्या लिपीक म्हणून काम करीत होत्या. गेल्या चार दिवसांपासुन बेपत्‍ता असलेल्या चंद्रप्रभा यांचा नदीपात्रात अचानकपणे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. पोटेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने तेथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading...
You might also like