३५० आधार कार्ड सापडली कचराकुंडीत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- भिवंडीतील अजयनगर परिसरात कचराकुंडीमध्ये सुमारे ३५० आधारकार्ड सापडली. हा प्रकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवसापुर्वी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  या प्रकरणाची दखल घेऊन भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी व अहवाल सादर करण्याच्या आदेश दिले आहेत.

निवडणुकांच्या काळात बनावट आधार कार्ड,व ईतर महत्वाची ओळखपत्रे तयार करुन गैरप्रकार झाल्याच्या घटना याआगोदर देखील उघड झाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकांच्या काळात अनुचित प्रकार घडून नये ,यासाठी जिल्हा प्रशासन या घटनेची कसून चौकशी करत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात आधारकार्ड,मतदानकार्ड आणि अन्य ओळखपत्रांच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गैरप्रकार होण्याचा धोका निर्माण होत असतो.  यासाठी आचारसंहितेच्या काळात प्रशासानाकडून प्रत्येक बाब ही गांभीर्याने घेतली जाते. तसेच यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे. भिवंडी येथील अजयनगर परिसरातील एका कचरा कुंडीत सुमारे साडे तीनशे आधारकार्ड सापडल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.या प्रकरणाची  पुढील तपासणी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर हे करत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

‘या’ महिन्यात वरुण चढणार बोहल्यावर ?

‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त संपूर्ण माहिती वाचा सविस्तर

राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

”मी चौथ्या आघाडीत जाणार नाही , मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य”

‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त