धक्कादायक ! ‘या’ देशात 350 हत्तींचा रहस्यमयी मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवानामध्ये 350 हून अधिक हत्तींचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. या हत्तींच्या मृत्यूमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक लोकांनी म्हटले आहे की, बहुतेक हत्ती जलस्रोतांजवळ सापडले आहेत. आता बोत्सवाना सरकार हे शोधण्याचा प्रयत्नात आहेत कि, या हत्तींना विषबाधा झाली आहे की, काही अज्ञात आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे ?

उत्तर बोत्सवाना आणि त्याच्या ओकावांगो डेल्टामध्ये 350 हून अधिक हत्तींचे मृतदेह सापडले आहेत. हत्तीचा पहिला रहस्यमयी मृत्यू मे महिन्यात झाला होता. काही दिवसांतच ओकवांगो डेल्टामध्ये 169 हत्तींचा मृत्यू झाला. माहितीनुसार, जूनच्या मध्यापर्यंत हत्तींच्या मृत्यूची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. या हत्तींपैकी 70 टक्के जलकुंभाच्या आसपास मरण पावले आहेत. बोत्सवाना सरकारने अद्याप या हत्तींच्या मृतदेहाची चौकशी केलेली नाही.

नॅशनल पार्क रेस्क्यूचे संचालक डॉ. निएल मॅक्केन म्हणाले की, इतक्या मोठ्या संख्येने हत्ती मरण पावले आहेत हे बर्‍याच वर्षांनंतर पाहिले गेले आहे. सहसा दुष्काळामुळे हत्तींचे असे मृत्यू घडत असतात, परंतु अशा मृत्यूचे कारण सध्या समजलेले नाही. देश आणि जगातील शास्त्रज्ञांनी बोत्सवाना सरकारला हत्तींच्या मृतदेहाची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे की, एखादा नवीन आजार पसरला आहे की नाही हे शोधण्यासाठी. शास्त्रज्ञांना अशी भीती वाटते की, हत्तींच्या मृत्यूनंतर काही रोग मानवांमध्ये पसरत पसरू नये. ते पुढे म्हणाले कि, हत्तींच्या मृतदेहाची परिस्थिती पाहिल्यास तुम्हाला आढळेल की, काही हत्तींचा मृत्यू त्वरीत झाला आहे. कारण ते सरळ त्यांच्या चेहऱ्यावर पडले आहेत. तर काही हत्ती हळू हळू मेले आहेत. मग असे का घडले हे सांगणे कठीण आहे?

स्थानिक लोकांनी सांगितले की, त्यांनी हत्तींना एकत्र फिरताना पाहिले आहे. हत्ती असे तेव्हा करतात, जेव्हा ते पाहू शकत नाहीत. जेव्हा ते आजारी असतात किंवा त्यांना एखाद्याने विष दिले असेल, तेव्हा त्यांची दृष्टी जाते. या दोन्ही कारणांमुळे त्यांची मज्जासंस्था कमकुवत होऊ लागते. बोत्सवानाच्या वन्यजीव विभागाचे संचालक डॉ. सिरिल ताओलो म्हणाले की, आम्हाला हत्तींच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही 350 हत्तींपैकी 280 मृत्यूची पुष्टी करतो. इतर पुष्टीसाठी काम चालू आहे. दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे हत्तींची संख्या 80 हजार ते 1.30 लाखांदरम्यान आहे. दरम्यान, शिकार केल्यामुळे हत्तींची संख्याही कमी झाली आहे. परंतु जर एखादा रोग अशाप्रकारे हत्तींना मारत असेल तर ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे.