राजधानीतील गो शाळेत  ३६ गायींच्या मृत्यूने खळबळ 

दिल्ली: वृत्तसंस्था

देशात सध्या गायी वाचवण्याची  मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे. भारताच्या पंतप्रधानांनी नुकत्याच आफ्रिकेतील रवांडा देशाला २०० गायी  भेट दिल्या. मात्र राजधानीत (दिल्ली ) मध्ये द्वारका भागात एका गो शाळेत ३६ गायी मृतावस्थेत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b18c1060-9252-11e8-9941-edf7f49fc6e1′]

राजधानी दिल्लीतील या गोशाळेमध्ये एकूण १४०० गायी आहेत. त्यातील ३६ गायींचा मृत्यू झाला आहे. कुठल्या तरी रोगामुळे इतक्या मोठया प्रमाणावर गायींचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. काल या गोशाळेतील दोन गायींचा मृत्यू झाला होता. डॉक्टर घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.