रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बहिणींसाठी सरकारचं अनोखं ‘गिफ्ट’, ‘इथं’ ३६ तास मिळणार एकदम ‘फ्री’ प्रवास

पानिपत : वृत्तसंस्था – भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला असताना देशभरात सर्वत्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. यातच हरियाणा सरकारने मात्र या मुहूर्तावर बहिणींसाठी रक्षाबंधनाचे अनोखे गिफ्ट देत बस सेवा मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ ऑगस्टच्या दुपारी १२ पासून १५ ऑगस्टला रात्री १२ पर्यंत हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडच्या सीमाभागातील महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा हरियाणा सरकारने केली आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती ट्राफिक मॅनेजर कर्मवीर यांनी दिली. त्यांनी सांगितल्यानुसार प्रवाशांच्या संख्येनुसार आणि मागणीनुसार आवश्यक मार्गांवरील बस ची संख्या देखील वाढविली जाणार आहे.

वोल्वो मध्ये नाही मिळणार मोफत प्रवासाची सुविधा
राज्य सरकारने घोषित केल्यानुसार महिलांना मोफत प्रवासाची सुविधा केवळ राज्य शासनाच्या गाड्यांमध्ये दिली जाणार असून वोल्वो बससाठी मात्र सूट लागू असणार नाही. ज्या महिला अन्य खाजगी वाहनांनी प्रवास करतील त्यांच्याकडून नेहमीप्रमाणेच भाड्याची शुल्कवसुली केली जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त