Coronavirus : महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा, 36 तासापर्यंत घरात ‘कैद’ राहतील लोक

वर्धा : पोलीसनामा ऑानलाइन –  कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत. यावरूनच वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

शाळा-कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद
आदेशानुसार, केवळ मेडिकल स्टोअर्स आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधीत लोकांनाच कर्फ्यूमध्ये येण्या-जाण्याची परवानगी असेल. याशिवाय सर्वकाही बंद राहील. यावेळी सरकारने पेट्रोल पंपसुद्धा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वर्धा जिल्हा कलेक्टर प्रेरणा एच. देशभर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पहाता शाळा आणि कॉलेज पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचे सुद्धा आदेश जारी करण्यात आले आहेत.

24 तासात मिळाले विक्रमी 5427 रूग्ण
रिपोर्टनुसार, महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यात अचानक कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 5427 नवीन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत, जो या वर्षातील कोणत्याही राज्यातील सर्वात मोठा आकडा आहे. वेगाने परतत असलेली कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकारने सक्त मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. सोबतच अमरावतीमध्ये वीकेंडवर लॉकडाऊन आणि यवतमाळमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

90 लोकांमध्ये नवा स्ट्रेन असण्याची शक्यता
तर मुंबईत बीएमसीने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) कडे 90 अशा लोकांचे सॅम्पल पाठवली आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन असण्याची शक्यता आढळून आली आहे. याचा रिपोर्ट 7-10 दिवसांच्या आत येईल. तोपर्यंत बीएमसी कमिश्नर इक्बाल सिंह चहल यांनी कोरोना गाईडलाईनचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.