माजी उपमहापौरांचे पती आणि मटकाकिंग मुल्‍लांची ३६ लाखांची रोकड जप्‍त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायांच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशेबी ३६ लाख रुपये व हिशेबाच्या वह्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आतापर्यंत ३९ आरोपींना ‘मोक्का’ कारवाईखाली अटक केली आहे.

मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करणाऱ्या ‘मुल्ला गँग’चा मुख्य म्होरक्या सलीम मुल्लासह त्याची पत्नी शमा, भाऊ फिरोज, राजू, जावेद यांच्यासह ४० जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल करून, संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली ‘मोक्का’ कारवाई केली आहे.

मुल्ला याच्या घरझडतीमध्ये जुगार, गांजा तस्करी, सावकारीतून बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे. मुल्ला हा विशिष्ट टोपणनावाने कुरिअर सर्व्हिसमार्फत अंगडिया सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार पार पाडत असल्याचे निष्पन्न झाले.

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

You might also like