नाशिक फाटा येथे ३६ लाखाचे ब्राऊन शुगर पकडले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – विक्रीसाठी आणलेले तब्बल ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर पिंपरी-चिंचवडच्या आमली विरोधी पथक आणि खंडणी, दरोडा विरोधी पथकाने जप्त केले आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर पकडण्याची ही पहिलीच कारवाई आहे. शनिवारी दुपारी नाशिक फाटा, कासारवाडी येथे ही कारवाई करुन एका महिलेस अटक केली आहे.

कलाराणी पोरीमसी देवेंद्र (५२, रा. म्हाडा बिल्डिंग, सायन, कोळीवाडा) या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी नाशिक फाटा येथे एक महिला मोठ्या प्रमाणावर ब्राऊन शुगर घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक श्रीराम पोळ, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक वसंत मुळे, पुरुषोत्तम चाटे, राजेंद्र बांबळे, काळे, खेडकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिची कसून झडती घेतली असता तिच्याकडे ३०० ग्राम वजनाचे ३६ लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आढळून आली. हे ब्राऊन शुगर तिने विक्रीसाठी आणले होते. पोलीस तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us