धक्कादायक ! अवघ्या 36 वर्षाच्या अभिनेत्याचे निधन

चेन्नई : सध्या देशात सुरु असलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे़ अशात दक्षिणेतील एका ३६ वर्षाच्या अभिनेत्याचे निधन झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तमिळ अभिनेता सेथुरामन यांचे चेन्नईत ह्दयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सेथूरामन २०१३ मध्ये आलेल्या ‘कन्ना लड्डु थिना आना’ या रोमॅटिंक कॉमेडी सिनेमामधून लोकप्रिय झाला होता.

दक्षिणेतील अभिनेता सतीश आणि अभिनेत्री ऐश्वर्या राजेश यांनी सोशल मिडियावरुन सेथुरामनच्या निधनाची माहिती दिली. सतीश यांनी ट्विट केले. सेथुरामनच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. अभिनेता सेथुरामन याला गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अभिनेता सेथुरामनने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या जागतिक प्रसाराबाबत बोलताना एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यात त्याने लोकांनी स्वत: घरी रहावे व स्वत:ला सुरक्षित ठेवावे़ म्हणजे देश आपोआप सुरक्षित राहील. काही जणांनी तुम्हीही सुरक्षित रहा असे उत्तर दिले होते. मात्र, आज सेथुरामन यांचे इतक्या कमी वयात निधन झाले आहे.