कलम 370 ! काश्मीरला 36 केंद्रीय मंत्री देणार भेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – इंटरनेट बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे, हे दर्शविण्यासाठी प्रथमच ३६ केंद्रीय मंत्री जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाला ५ महिने उलटून गेले तरी काश्मीरमधील परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. त्यामुळे सामान्य लोकांना विश्वास देण्यासाठी हा दौरा होणार आहे.

हे मंत्री १८ ते २५ जानेवारी या दरम्यान काश्मीरमधील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी दौरा करतील. जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहे किंवा जम्मू काश्मीरचा विकास योग्य प्रकारे कसा करता येई. याविषयी माहिती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या १७ जानेवारीच्या बैठकीत मंत्र्याचा हा जम्मू काश्मीर दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल हे जम्मू -काश्मीरचा १९ जानेवारीला भेट देण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/