राज्यातील ३७ आयपीएस (IPS) अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (सोमवारी) तब्बल 37 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

बदल्या झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे :- डॉ. हरीबालाजी एन. (अप्पर अधीक्षक, गडचिरोली ते अधीक्षक, अमरावती ग्रामीण), हर्ष पोद्दार (उपायुक्‍त, नागपूर शहर ते अधीक्षक, बीड), अमोघ गांवकर (अधीक्षक, नागपूर रेल्वे ते अधीक्षक, अकोला), पंडित एम. कमलाकर (अप्पर अधीक्षक, गडचिरोली ते अधीक्षक, नंदूरबार), मंगेश पोपटराव शिंदे (उपायुक्‍त, झोन-3, पुणे शहर ते अधीक्षक, गोंदिया), संदिप घुगे (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर अधीक्षक, मालेगाव, नाशिक ग्रामीण – पदोन्‍नतीने), मनिष कलवानिया (सहाय्यक अधीक्षक ते अप्पर अधीक्षक, गडचिरोली – पदोन्‍नतीने), श्रीमती रागसुधा आर. (सहाय्यक अधीक्षक, अप्पर अधीक्षक, परभणी – पदोन्‍नतीने), श्रीमती भाग्यश्री नवटके (सहाय्यक अधीक्षक, अप्पर अधीक्षक, जळगाव – पदोन्‍नतीने), नुरूल हसन (सहाय्यक अधीक्षक, अप्पर अधीक्षक, यवतमाळ), अतुल कुलकर्णी (सहाय्यक अधीक्षक, अप्पर अधीक्षक, अकोला – पदोन्‍नतीने), निखिल एन. पिंगळे (अप्पर अधीक्षक, वर्धा ते अप्पर अधीक्षक, गोंदिया), जी. श्रीधर (एसपी, बीड ते समादेशक, एसआरपीएफ, वडसा देसाईगंज), चंदर किशोर मीना (समादेशक, एसआरपीएफ, गट क्रं. 8, मुंबई ते उपायुक्‍त, बृहन्मुंबई), राकेश सी. कलासागर (अधीक्षक, अकोला ते अधीक्षक, तांत्रिक सेवा, सीआयडी, पुणे), प्रणय अशोक (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 4, नागपूर ते उपायुक्‍त, बृहन्मुंबई), रंजन शर्मा (अधीक्षक, सीआयडी, नागपूर ते उपायुक्‍त, बृहन्मुंबई), अंकीत गोयल (उपायुक्‍त, झोन-2, भिवंडी, ठाणे ते उपायुक्‍त, बृहन्मुंबई), विनीता साहू (अधीक्षक, गोंदिया ते उपायुक्‍त, मुख्यालय, नवी मुंबई), प्रविण सी. पाटील (मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई ते उपायुक्‍त, गुन्हे, नवी मुंबई), निलोत्पल (अप्पर अधीक्षक, मालेगाव, नाशिक ग्रामीण ते उपायुक्‍त, झोन-5, नागपूर शहर), प्रशांत व्ही. होळकर (उपायुक्‍त-प्रशासन, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते उपायुक्‍त, मुख्यालय, अमरावती शहर), निवा जैन (अधीक्षक, सीआयडी, अमरावती ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 1, पुणे), डॉ. अक्षय ए. शिंदे (अप्पर अधीक्षक, नांदेड ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक 3, जालना), लोहीत मतानी (अप्पर अधीक्षक, जळगाव, समादेशक, एसआरपीएफ क्रं.9, अमरावती), निमित गोयल (अप्पर अधीक्षक, सिंधुदूर्ग ते समादेशक, एसआरपीएफ क्र. 8, मुंबई), संजय पाटील (अधीक्षक, नंदूरबार ते समादेशक, एसआरपीएफ गट क्रमांक 6, धुळे), सुरेशकुमार एस. मेंगडे (उपायुक्‍त, नागरी हक्‍क ते उपायुक्‍त, नवी मुंबई), संदीप जी. दिवान (एसपी, अ‍ॅन्टी करप्शन, पुणे ते अधीक्षक, सीआयडी, पुणे), विक्रम देशपामने (उपायुक्‍त, झोन-5, मुंबई ते अधीक्षक, गुप्‍तवार्ता कक्ष, एटीएस, मुंबई), सुधाकर पठारे (उपायुक्‍त, झोन-1, नवी मुंबई ते उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई), सचिन पाटील (उपायुक्‍त, मुख्यालय-1, मुंबई ते समादेशक, एसआरपीएफ क्र. 11, नवी मुंबई), राजेश आर. बनसोडे (उपायुक्‍त, मुख्यालय ते एसपी, अ‍ॅन्टी करप्शन, पुणे), अरविंद एच. चावरिया (समादेशक, एसआरपीएफ गट क्रमांक 1, पुणे ते एसपी, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद), सुधिर हिरेमठ (सहाय्यक पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), राज्य पोलिस मुख्यालय, मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, झोन-2, पिंपरी-चिंचवड), विजय मगर (अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक ते उपायुक्‍त, सोलापूर शहर) आणि अभिषेक त्रिमुखे (उपायुक्‍त, झोन-1, ते सहाय्यक पोलिस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय), राज्य पोलिस मुख्यालय, मुंबई).

महत्वाचे :- आयपीएस अधिकारी संदिप घुगे, मनिष कलवानिया, श्रीमती रागसुधा आर., श्रीमती भाग्यश्री नवटके, नुरूल हसन आणि अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवेची 4 वर्ष पुर्ण केली असल्याने त्यांना वरिष्ठ समय श्रेणीमध्ये पदोन्‍नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.

टीप :- आयपीएस अधिकारी दिलीप एन. झळके (अधीक्षक, अमरावती ग्रामीण) यांची या आदेशान्वये बदली करण्यात आली आहे मात्र त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

You might also like