हिंदुस्थानी चित्रपटातील कमल हसन सारखे काम करणारे RTO कार्यालयातील ३७ अधिकारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

परिवहन विभागातील पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, पनवेल, ठाणे आणि यवतमाळ येथील उप प्रादेशीक परिवहन कार्यालयातील २८ मोटार वाहन निरीक्षक आणि ९ सहायक मोटार वाहन निरीक्षकांना राज्याच्या गृहविभागाने आज (२१ सप्टेंबर) निलंबीत केले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी वाहनांची काटेकोरपणे तपासणी न करता वाहनांना योग्यता प्रमाणपत्र जारी केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात  जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28fe21a6-bdba-11e8-8e96-537a395b9877′]

निलंबीत करण्यात आलेल्या  परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची नावे त्या पुढील कंसात सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव पुढील प्रमाणे…

योगिता अत्तरदे (औरंगाबाद), हरिशकुमार अ. पवार (औरंगाबाद), किशोर रा. पवार (औरंगाबाद), शंकर नि. कराळे (यवतमाळ), सुनिल क्षीरसागर (पिंपरी-चिंचवड), मयुर श्री. भोसेकर (पिंपरी-चिंचवड), ए.व्ही गवारे (पुणे), विजयसिंह भोसले (पुणे), समीर सय्यद (पुणे), प्रदीप बराटे (पुणे), रंगनाथ बंडगर (पुणे), राजेंद्र केसकर (पुणे), जकीउद्दीन पाशमिया बिरादार (सातारा), अरविंद फुलारी (रत्नागिरी), संदीप म्हेत्रे (पुणे), राहुल नलावडे (कोल्हापूर), अनिस अहमद सरदार बागवान (पेण), विजय शा. सावंत (पुणे), संभाजीराव होलमुखे (पुणे), ललीत देसले (कल्याण), सुनिल म्हेत्रे (ठाणे), सुरेश आवाड (ठाणे), समीर शिरोडकर (ठाणे), रविंद्र सोलंके (सांगली), सुनिल राजमाने (कराड), अश्विनी जाधव (अमरावती), संतोष गांगर्डे (औरंगाबाद), दत्तात्रय गाढवे (बुलढाणा)

सहायक मोटार वाहन निरिक्षक

राजकुमार मोरमारे (यवतमाळ), नितीन पारखे (पुणे), त्रिवेणी गालिंदे (पुणे), सावन पाटील (पुणे), ज्योतीलाल शेटे (पुणे), प्रदिप बन्सी ननवरे (पनवेल), रमेश पाटील (पनवेल), रविंद्र राठोड (ठाणे), यु.जे. देसाई (कराड).